कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार विरोधात वणीत जाहीर निषेध !

वणी /

 काँग्रेस नेते व ब्रम्हपुरी चे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी जे एकेरी वक्तव्य केले त्याबद्दल यवतमाळ पूर्व मधील सर्व गुरुबंधू गुरू भगिनी मिळून विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध केला.
सोमवारी शासकीय पाण्याची टाकी जवळ जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व संप्रदायाचे गुरुबंधु भगीनी एकत्र आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी नारेबाजी केली.
विजय वडेट्टीवार यांनी जाहीरपणे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची जाहीर माफी मागावी अशी घोषणाबाजी करत त्यांचा जाहीर निषेध केला.
यामध्ये संप्रदायाचे वनी तालुका अध्यक्ष नागो आतमंगल, जिल्हाध्यक्ष कैलास डोंगरकर जिल्हा सचिव दीपक मोरे, पिठाचे जनगणना प्रमुख चंद्रशेखर टेंभेकर, पिठाचे ब्लड कॅम्प प्रमुख प्रणय काळे, सोबतच रवि बेलूरकर, शंकर घोगरे , बापू घोगरे, संतोष घुगुल, सुभाष मंडळे ,सुभाष मते, राजू घोगरे ,हिरामण संदलवार ,यादव सातपुते, सुनील श्रीरामे, विठ्ठल विरुटकार, स्वप्नील गौरकर तसेच समस्त जिल्ह्यातील गुरुबंधू ग्रुप भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post