वणी /
वणी येथील भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय बाबु चोरडिया यांनी आज रविवारी सकाळी तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी लावली असून यावेळी त्यांनी सहपत्नी सौ सिमा चोरडिया, व मित्र परिवारासह महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
यावेळी मा श्री नरेंद्रजी बरडीया, सौ बरडीया , महाविर कटारीया व सौ कटारीया, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, पत्रकार संदिप बेसरकर, परशुराम पोटे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बन्सोड, रवी रिंगोले, चालक प्रमोद उरकुडे, सुधाकर कोडापे, फैजल शेख यांनी महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावली.