वणी /
तालुक्यातील घोन्सा येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा गुरुवारी २० फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा झाला. केवळ घोन्साच नव्हे तर वणी, मारेगाव, झरी तालुका आणि दुरूनही हजारोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी आले होते. यानिमित्त भरलेल्या यात्रेत आबालवृद्धांनी आनंद घेतला.
दिनांक १४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी प्रगटदिनानिमित्त भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गुरुवारी सकाळी श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिराच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झाला. विशेष सांगायचे झाल्यास हे प्रवेशद्वार त्यांनी आत्मप्रेरणेतून बांधून दिले.
यावेळी पत्रकार राजू धावंजेवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल मुंजेकर, संत गजानन महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप काकडे, संस्थेचे विस्वस्त पांडुरंग निकोडे, समस्त पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मंदिराला भेट
श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गुरुवारी २० फेब्रुवारीला चंद्रपूर-वणी-अर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे सुधाकर गोरे, किशोर मालेकर, विलास बावणे, सरपंच मंगेश मोहुर्ले, उपसरपंच बाळू जिवने, सुधाकर गोरे, संतोष कुचनकर, पार्थ धानोरकर, कुंदन टोंगे, डॉ. जगन जुनगरी, सुनील नांदेकर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन संस्थानचे अध्यक्ष दिलीप काकडे यांनी केले.
२१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत शिव महापुराण कथा
श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिरात शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
हभप कु. स्वातीताई पंढरपूरकर आणि संच यांच्या सुश्राव्य वाणीतून कथेचे भाविकांना श्रवण करता येणार आहे. ही शिवमहापुराण कथा २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत दररोज दुपारी २:३० वाजता या वेळेत सुरू होईल.
यात्रा महोत्सवात भव्य आनंद बाजार