आता तर हदच झाली! घरासमोरुनच सायकल चोरून नेली... वणीत चोरट्यांचा धुमाकूळ.!

वणी /
वणी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय रोज एक नवीन चोरीची घटना उघडकीस येतात कधी घरफोडी तर कधी मोटार सायकल चोरी, आता तर भरदिवसा घरासमोरुन चक्क सायकल चोरीची घटना समोर आली आहे. 
शहरातील मुख्य चौक असलेल्या टागोर चौक येथे वास्तव्यास असलेले श्रीपाद सराफ यांच्या घरासमोर ठेवून असलेली सायकल अज्ञात चोरांनी चोरून नेली. हि घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे श्रीपाद सराफ यांच्या मुलीची सायकल चोरीला गेल्याने आता शाळेत जायचं कसे असा प्रश्न तिला पडला आहे. याबाबत श्रीपाद सराफ यांनी वणी पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलिस शोध सायकल चा घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post