वणी :
राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागली आहे, गेल्या आठवडाभरात उष्णता, आणि ढगाळ वातावरण असं संमिश्र वातावरण दिसून आलं. मात्र, आता पुन्हा राज्यात गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात पुन्हा घट होताना दिसत आहे.
वणी परिसरात देखील गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गारठा वाढल्यामुळे नागरिक भरदिवसा ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत, शहरातील नगर परिषद परिसरात काही नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच शेकोटी पेटवली. आणि पहाता पहाता शेकोटीच्या भवताल मैफिल जमली.
काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.