वणी :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्त वर्धा नदीच्या तीरावर सावर्ला शिवेमध्ये पाटाला धुळ यात्रा भरतात, या यात्रेच्या निमीत्ताने भव्य आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अखिल सातोरकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
या शिबिराचा उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक १६ डिसेंबर ला होणार आहे. सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेता येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून, वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना (उबाठा), सुनिल कातकडे, अध्यक्ष, इंदिरा सह.सुतगिरणी, प्रा. दिलीप मालेकर, इजहार शेख, उमेश बोढेकर, सौ. वैशाली सुर, सरपंच - झोला, सौ. कुंदा सुभाष चोपणे सरपंच -सावर्ता, सौ. गिता विलास मेश्राम, सरपंच- नायगांव, सौ. खामनकर,सरपंच- कोना,सौ. अर्चना प्रमोद डाखरे, सरपंच- वडगांव, अविनाश सोमलकर, उपसरपंच, सावर्ला , महादेव वरपटकर, उपसरपंच- नायगांव, निदेश हनुमंते, माजी सरपंच- कोना, विठ्ठल आवारी, प्रमोद डाखरे,सोनु चवले, नितीन तुराणकर, सौ. निता येलादे,सौ. वनिता आवारी, सुरेंद्र सुर, सौ. प्रिती रासेकर, इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तर या शिबिराला डॉ. गणेश निमजे MD हृदयरोग व मधुमेह तज्ञ,डॉ. किशोर व्यवहारे, MS शल्करोग तज्ञ, डॉ. प्रेमानंद आवारी, DGO स्त्री रोग तज्ञ, डॉ. सुनिल जुमनाके, MD बालरोग तज्ञ, डॉ. विजय खापणे DNB Ortho. अस्थिरोग तज्ञ, डॉ. नईम शेख BHMS जनरल फिजिशियन,डॉ. साहिबा शेख BAMS प्रसूती व स्त्री रोग तज्ञ, डॉ. अमोल पदलमवार,BDS दंतरोग तज्ञ, डॉ. पल्लवी पदलमवार, BAMS त्वचारोग तज्ञ, डॉ. विवेक गोफणे BAMS जनरल फिजिशियन तथा त्वचारोग तज्ञ,डॉ. वैशाली वि. गोफणे, BAMS स्त्री रोगतज्ञ तथा त्वचा रोग तज्ञ,तथा अमन रक्तपेढी, नागपुर यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अखिल सातोरकर यांनी केले आहे.
शिबीराचा लाभ घेण्याकरिता विलास आवारी - ९३७०६९१५९८, आकाश तुराणकर- ८३२९२००४२०, राजु मेश्राम- ९८२३८३३१२७, दिपक पेटकर-८२६५०२२९०५, सुरज चोपणे-७६२०१३०२६७, गौरव चोपणे-८७८८३६१८७४, तात्याजी सुर-९८२३१३९१६०, विकास रासेकर- ९८६०८७७५८१, उत्तम डाखरे- ९६०४९३९३९०, विवेक लडके- ९३७३०२७८८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन, आयोजक अखिल सातोकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.