राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उसाहात संपन्न, दत्त जयंती निमित्त चोरडिया फार्म हाऊसवर पार पडला...

वणी :
वणी - घुग्गुस मार्गावरील मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.  
 या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वरोरा येथील राधे राधे पाच पंडितांच्या हस्ते पूजा अर्चना होम हवन करून विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेला ऍडव्होकेट कुणाल चोरडिया व सौ ख्याती चोरडिया यांचे शुभहस्ते पूजा करण्यात आली. यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी चोरडिया परिवाराच्यावतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजय देरकर, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, माजी आमदार विश्वास नांदेकर, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष एडवोकेट देविदास काळे, पणन महासंघाचे अध्यक्ष संजय खाडे, काँग्रेसचे इजहार शेख, राजू कासावार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
 यावेळी विजय चोरडिया आणि सौ सीमा चोरडिया यांनी सर्व भक्तांचे स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post