राष्ट्र व समाजापुढील संकटांचा सामना करणाऱ्यांचे शासन हवे - निलेश भिसे

वणी :- 
स्त्री ही शक्ती स्वरुपा आहे. तिला हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान आहे. स्त्री - पुरुष समानतेचे खुळ निर्माण करून तिला खाली आणल्या जात आहे. स्त्रीचे विकृतीकरण करून आपल्या संस्कृतीला, धर्माला सुरुंग लावून विभाजनाचे राष्ट्रव्यापी संकट उभे होत आहे. याला आपल्याला संघटितपणे मुकाबला आपल्याला करायचा आहे. या राष्ट्र व समाजासमोरील संकटांचा सामना करणाऱ्यांचे सामर्थ्य असलेले शासन प्रत्येक राज्यासह देशात हवे असे प्रतिपादन शिवशंभो चरित्र अभ्यासक निलेश भिसे यांनी केले. ते लोकजागरण मंच तर्फे राष्ट्रासमोरील संकटे या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार हभप दामोदरपंत आवारी, भागवतचार्य हभप मनु महाराज, गुरुदेव सेवा मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजयाताई दहेकर उपस्थित होते.
        आपला विषय मांडताना निलेशजी पुढे म्हणाले की, या देशात जिथे जिथे हिंदू मोठ्या संख्येने आहेत तिथे तिथे शांतता आहे. पण हिंदू अल्पसंख्यांक झाला की, त्यांच्या अत्याचार होवून परांगदा होण्याची पाळी येते हे आपण स्वातंत्र्यानंतर सुध्दा अनुभवत आहोत. त्याचसाठी प.पू. डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली हिंदूंचं संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी मांडलेल्या विचारधारेचे सरकार आज आपल्या देशात आहे. ही आपल्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. 2014 नंतर येथील हिंदु धर्मात चेतना जागृत होऊन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तो आत्मविश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. 
       आपल्या समाजावरील, धर्मावरील व देशावरील सांस्कृतिक, सामाजिक आक्रमण रोखायचे असेल तर आपल्याला संघटित होणे गरजेचे आहे. इस्लामी आक्रमणे झाल्यानंतर स्त्रियांना लैंगिक गुलाम करून ठेवण्याचे काम सुरू झाले. त्यांचं आता लव्ह जिहाद मध्ये रुपांतर झालं आहे. वक्फ बोर्डाकडे प्रचंड जमीन संपत्ती आहे. सन 1995 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने वक्फ कायदा पास केल्यापासून या बोर्डाला कोणत्याही जमिनीवर आपला हक्क सांगून मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यात कुठे तरी संशोधन होण्याची गरज आहे. संपत्ती, पैसा, शिक्षणाचा अभिमान न बाळगता आपण राष्ट्रभक्त हिंदू असल्याचा अभिमान बाळगा असा संदेश त्यांनी दिला. 
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रंचालन व आभारप्रदर्शन गजानन कासावार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post