महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा, भाजपा मध्ये जल्लोषाचे वातावरण...

वणी :
वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक वलय बघता त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी दणदणीत विजय संपादन केला आणि यावेळी सुद्धा त्यांचा विजय पक्का माणल्या जात आहे. त्यामुळे घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्या आहेत. 
१७ नोव्हेंबरला महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा काढण्यात आली होती दरम्यान शहरातील प्रगती नगर येथे पदयात्रा येताच 
 सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. महेश पहापळे यांचा शहरात मोठ्या संख्येने मित्र परिवार आहे हे विशेष...
यावेळी महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश पहापळे यांनी महायुतीचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post