धनगर समाज संघर्ष समिती सह विविध संघटनांचा आ. बोदकुरवार यांना जाहीर पाठिंबा

वणी:- विशाल ठोंबरे 

       वणी विधानसभा क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक संघटनाद्वारा वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे पारडे मजबूत झाले असल्याचे बोलले जात आहे. 
    वणी विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी महायुती शासनाने पूर्ण प्रयत्न बहुतांश समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे गुरुदेव चिडे, आशिष ढवळे, करण चिडे, शुभम खुजे, आकाश ढवळे, राजू लोणारे, अनिकेत चामाटे आशिष कालर यांच्या सह 25 पदाधिकाऱ्यांच्या साह्य असलेले पत्र आ. बोदकुरवार यांना देण्यात आले. 
     त्यासोबत बिरसा ब्रिगेडचे शेषराव मडावी, अ. भा. विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष अनिल गेडाम, आदिवासी जन संग्राम संघटसनेचे कार्याध्यक्ष श्रीधर सिडाम यांनी सुद्धा आपापल्या संघटनेचे पाठिंबा देत असल्याबाबतचे पत्र आ. बोदकुरवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या वणी विधानसभा क्षेत्रात संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा जनाधार प्रचंड वाढला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post