आता खेळाडूंनीही दर्शविला आ.बोदकुरवार यांना पाठिंबा, भाजपा मध्ये जल्लोषाचे वातावरण...

वणी : दिपक छाजेड

वणीतील युवा खेळाडूंनी वणीचे विकास पुरुष व महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. राजकीय व सामाजिक वलय बघता संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आमदार बोदकुरवार यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये सलग दोन वेळा दणदणीत विजय संपादन केला आणि यावेळी सुद्धा त्यांचा विजय पक्का माणल्या जात आहे. त्यामुळे घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना सह आता युवा वर्ग, खेळाडू उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागले आहेत. 
१७ नोव्हेंबरला महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा काढण्यात आली होती दरम्यान शहरातील प्रगती नगर येथे पदयात्रा येताच 
 सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक बंटी शेंडे व खेळाडूंनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post