वणी :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त आज शनिवारी ३० नोव्हेंबर ला वरोरा रोड वरील एस.बि.लॉन येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. प्रकाश सिरसाट जेष्ट आंबेडकरी विचारवंत, छत्रपती संभाजी नगर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, प्रा.तक्षशिल सुटे, आनंद निकेतन विद्यालयात वरोरा हे भारतीय संविधान, निर्मीतीचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका व भारतीय संविधान, अनु,जाती जमाती व ओ.बि.सी.समाजा पुढील आव्हाने या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने करण्यात आले आहे.