वणी :
समस्त वणीकर व पंचक्रोशीतील नागरीकांसाठी श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र श्री कॉम्पेक्स सूर्योदय चौक जत्रा मैदान रोड वणी येथे दि.1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4.00 ते 7.30 वाजेपर्यंत
" मोफत नाडी परिक्षण व आयुर्वेदोक्त रोगनिदान " शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामधे शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य.सुवर्णा चरपे .पुणे या रुग्ण तपासणी करतील. नाडीपरिक्षणाकरीता शक्यतोवर जेवण न करता यावे. चहा ,पाणी इ.जल पदार्थ पिवून आल्यास हरकत नाही .सर्व शारीरिक आजारांवर शास्त्रोक्त रोगनिदान व आहार मार्गदर्शन, पंचकर्म सल्ला येथे देण्यात येणार आहे.
शिबिरात तपासणी करणाऱ्या शिबिरार्थींना औषधी शुल्कावर १०% सवलत व पुढील तिन महिने तपासणी मोफत राहणार आहे.तरी या शिबीराचा लाभ समस्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वैद्य.चरपे यांनी केले आहे.
संपर्कासाठी मोबाईल नं.=
7038381553.
8208253610.