खाती चौक ते इंदिरा चौक रस्त्याचे काम दिड महिन्यांपासून बंद, सिद्दीक रंगरेज यांची नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांच्याकडे काम सुरू करण्याची मागणी

वणी :
शहरातील मुख्य मार्गावरील म्हणजे खाती चौक ते इंदिरा गांधी चौक या रस्त्यावर कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे मात्र दिड महिन्यांपासून सदर काम बंद असल्याने अर्धवट कामामुळे नागरीकाना खुप त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी सदर भागातील माजी नगरसेवक सिद्दीक रंगरेज यांनी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांची भेट घेऊन दिड महिन्यांपासून बंद असलेले रस्तयाचे काम सुरु करण्याची मागणी केली असता सदर काम लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी दिले असल्याची माहिती सिद्धीक रंगरेज यांनी 'स्टिंग ऑपरेशन न्यूज' ला दिली.

Post a Comment

Previous Post Next Post