येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक यांनी आज वयाची ९३ वर्षे पूर्ण केली असून ९४ व्या
वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्त त्यांचा माधव
सरपटवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी देवानंद पोद्दार , सौ.भारती सरपटवार , नामदेव पारखी प्रामुख्याने उपस्थित होते. सुधाकर पुराणिक हे जैताई देवस्थानचे सर्वात ज्येष्ठ संचालक
असून त्यांनी वणी पोलीस स्टेशनला व वणीच्या
इतर समाज जीवनात दीर्घकाळ सेवा दिली आहे.