सुकनेगाव येथे सदगुरु बाजीराव महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा

वणी :
तालुक्यातील सुकनेगाव येथे ब्रह्मलीन वंदनीय श्री सद्गुरू बाजीराव महाराज यांचा १३ वा पुण्यतिथी महोत्सव श्री बाजीराव महाराज मंदिर व्यवस्थापन समिती सुकनेगाव च्या वतिने साजरा करण्यात आला.
रविवारी सकाळी सहा ते आठ वाजता गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामगीता वाचन, ९ वाजता भजन कीर्तन त्यानंतर दहिहंडी व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. श्री बाळकृष्ण राजुरकर सर व ह.ब.प नामदेवराव शेलवडे यांनी केले.
शुक्रवार, शनिवार व रविवार असे तिन दिवस चाललेल्या या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला बाजीराव महाराज यांचे शिष्य दुरदुरुन मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post