वणी :
नगर पालिका हद्दीतील व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे खुप वर्षांपासून बंद अवस्थेत व दुर्लक्षीत आहे ते पूर्ववत सुरु करण्यात यावे व वाचनालयाच्या गेट समोरील अतिक्रमण काढून त्याला लोकोपयोगी करण्यात यावे अशी मागणी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर पालीका हद्दतील मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे जे मागील ३ दशकांपासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे ते पूर्ववत सुरु करण्यात यावे व सोबतच वाचनालयाच्या मुख्यद्वारा जवळील अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच रंगरंगोटी व साफसफाई करण्यात यावी व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात यावे. येत्या आठ दिवसात या वाचनालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी व कायमस्वरुपी सुरु करण्यात यावे अन्यथा ६ डिसेंबर २०२४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पुतळ्याजवळ) आमरण उपोषण करण्यात येईल याची नगर पालीका प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी बबलु मेश्राम, प्रविण खानझोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी के टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम, शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सूरज उपरे, दादाजी देठे सर्व सहकारी उपस्थित होते.