सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.!

वणी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला होता.¹
संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 
या दिवशी भारतीय नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे वचन दिले पाहिजे.
संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना अभिवादन! आपण संविधानाच्या मूल्यांचे पालन करूया आणि भारतीय लोकशाहीला मजबूत करूया,! असे विचार किरणताई देरकर संस्थापक अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी यांनी व्यक्त केले.
 ह्यावेळी चंदाताई मुन, पुष्पाताई भोगेकर, वृषालीताई खानझोडे , मंदा सोनारखन, प्रगती घोटेकर' मिनाक्षी मोहीते, सुरेखाताई ढेंगळे, मंजूताई इनामे, वेणुताई झोडे, लताताई फेतफुलवार, सारिका थेरे, सिमा बालगुणे यांच्या सह महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post