वणी -
बाजारातून सिताफळ विकत घेतांना तपासून घ्यावे कारण सिताफळात अळ्या आढळून आल्या आहेत असे आवाहन येथिल सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, उमेश पोद्दार हे मंगळवारी बाजारात गेले होते तेव्हा त्यांना जटाशंकर चौकात सिताफळ दिसून आले तेव्हा त्यांनी दोन किलो सिताफळ विकत घेऊन घरी आले आणि खाताना सिताफळ फोडून पाहिले असता त्यांना सिताफळ मध्ये अळ्या दिसून आल्या, अळ्या पाहताच उमेश पोद्दार संतापले आणि ज्या दुकानातुन सिताफळ विकत घेऊन आले होते त्या दुकानात सिताफळ वापस करण्यात आले. मात्र त्या सिताफळ विक्रेत्याला काय माहिती की सिताफळात अळ्या असेल. मात्र सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी ग्राहकांना आवाहन केले की बाजारातून सिताफळ विकत घेताना जरा तपासूनच घ्यावी.
बहूदा सिताफळाची लागवड केल्यापासून 5 ते 6 वर्षानी फळे मिळू लागतात. कलमे केलेल्या झाडांना 3 ते 4 वर्षात फळे लागण्यास सुरुवात होते. सिताफळांच्या झाडांना जून, जूलै मध्ये फूले येण्यास सुरुवात होते. फूले आल्यावर फळे तयार होण्यास सर्वसाधारणपणे 5 महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेबर ते नोव्हेबर मध्ये तयार होतात. आणि दसरा, दिवाळीच्या सुमारास सिताफळे बाजारात येतात. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर बाजारात सिताफळ आले आहे. मात्र चांगले दिसणाऱ्या सिताफळात अळ्या आढळून येत आहे त्यामुळे सिताफळ विकत घेताना तपासणी करून घेतल्यास मनस्ताप होणार नाही असे आवाहन उमेश पोद्दार यांनी केले आहे.