मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल, आणि राजु उंबरकर ठरले पहिले उमेदवार...

वणी: 
महाराष्ट्र विधानसभेसाठी मंगळवार 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र चार दिवस उलटले तरी मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नव्हते त्यामुळे सर्वांचे लक्ष आधी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान 
शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. 
त्यामुळे मान्यताप्राप्त पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे राजू उंबरकर हे पहिले उमेदवार ठरले आहे.
आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता वणीच्या शासकीय मैदान येथे हजारोच्या संख्येने राजू उंबरकर यांचे समर्थक गोळा झाले होते. यावेळी शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी शहरात रॅली काढली. ढोलताशाच्या गजरात निघालेली ही रॅली शासकीय मैदान ते टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड ऑइल मिल, सुभाषचंद्र बोस चौक, सर्योदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक असा मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयासमोर दाखल झाली. रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आजच्या रॅलीमुळे राजू उंबरकर यांचा ग्रामीण भागातील प्रभाव दिसून आला. मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरीक या रॅलीला उपस्थित झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून राजू उंबरकर यांचे सेवाभावी कार्य सुरु आहे. ते कायमच गोरगरीब जनतेच्या कामासाठी धावून जातात. त्यामुळे "कामाचा माणूस" म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post