वणीत रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट कीर्तन, रसिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहाण्याचे आवाहन...

वणी :

दिवाळीत धनत्रयोदशीला पहाटे ६ वाजता कीर्तन घेण्याच्या जैताई मंदिराच्या अभिनव उपक्रमाला या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचे रौप्यमहोत्सवी कीर्तन नागपूरच्या 
कीर्तनकार सौ. मृण्मयी कुळकर्णी व सौ.नुपूर देशपांडे ह्या
संयुक्त रीत्या सादर करणार आहेत. विशेष म्हणजे त्या ' शिवराज्याभिषेक सोहळा ' आपल्या आख्यानातून सादर करणार आहे.
कीर्तन २९ ऑक्टोबर मंगळवारी
धनत्रयोदशीला पहाटे ६ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. कीर्तनाचे आयोजन 
जैताई मंदिर व राज मंडप डेकोरेशनने केले आहे. कीर्तन कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर, स्व.नरेंद्र नगरवाला सौ.विमलताई धोटेचे मातापिता व स्व.गणपतराव व सरस्वतीबाई 
बिलोरीया यांच्या स्मरणार्थ आयोजित आहे.
या दिवाळीचा खरा आनंद देणार्या कीर्तनाच्या आनंदोत्सवात रसिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post