वणी :
शिरपूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 399,402 भा.द.वी. सहकलम 4/25 मध्ये 3 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला घुग्गुस येथुन ताब्यात घेऊन त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी शिरपूर पो.स्टे. परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना ठाणेदार माधव शिंदे यांना गुप्त माहीती मिळाली की, पो.स्टे. शिरपुर अप क्र.248/2021 कलम 399,402 भा.द.वी. सहकलम 4/25 शत्र अधिनियम मध्ये फरार आरोपी नौशाद शहादातुल्ला कुरेशी (34) रा. वार्ड क्र.2 घुग्गुस जि.चंद्रपुर येथे असल्याची खात्रीलायक माहीती मिळताच त्यांनी पो.स्टे. चे पोउपनि रावसाहेब बुधवंत व पो. स्टॉप यांना वरील कारवाई कामी आदेशित केले असता त्यांनी कोणताही वेळ न घालवता नमुद ठिकाणी आरोपीताचा शोध घेउन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नावाची पडताळणी करुन तो इसम नौशाद शहादातुल्ला कुरेशी वय 34 वर्षे रा. वार्ड क्र.2 घुग्गुस ता.जि. चंद्रपुर असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेउन अटक केली.
सदर आरोपीतास दिनांक 24/10/2024 रोजी मा. सत्र न्यायालय केळापुर येथे हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीचा जेल वारंन्ट केल्याने आरोपीची यवतमाळ कारागृहात रवानगी केली.
सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे ठाणेदार पो.स्टे.शिरपुर, पोउपनि/रावसाहेब बुधवत, पोहवा/ सुनिल दुबे, पोकॉ/ विनोद काकडे, पोकों/पंकज कुडमेथे यांनी पार पाडली आहे.