रा.से.यो. च्या कार्यक्रम अधिकारी सह विद्यार्थ्यांची उतुगं भरारी, डॉ. नीलिमा दवणे, अरमान अन्सारी, कु साक्षी काटेवाले, कु कविता आत्राम यांची निवड

वणी : 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संल्गीनीत लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दि.५/९/२०२४ रोजी विद्यापीठ स्तरीय निवड चाचणी घेण्यात आली. यात लोकमान्य टिळक महाविद्यालयातील रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांची आव्हान या आपत्ती व्यवस्थापन शिबिरामध्ये आयोजन समिती मध्ये निवड झालेली असून रा.से.यो.चे विद्यार्थी अरमान अन्सारी व कु साक्षी काटवले यांची निवड झाली आहे सोबतच स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे होणारा पूर्व गणतंत्र शिबीरीकरीता कु कविता आत्रामची निवड झाली असून प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे व यवतमाळ जिल्हा रा.से.यो. समन्वयीका तथा कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे व डॉ. विकास जूनगरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उतुगं भरारी घेत मानाचा तुरा रोवला आहे. सदर विद्यार्थी हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे ७/११/२०२४ ते १६/१०/२०२४ दरम्यान होणार्या आव्हाण चँलेन्जर ब्रिगेड ( महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबीर)२०२४ करीता निवड झाली असून तसे पत्रक प्राप्त झाले आहे. 
या निवडबद्दल संस्थेचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मूकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडीया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के तथा संचालक मंडळ , तसेच प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे , जिल्हा समन्वयीका तथा कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे, डॉ. विकास जुनगरी व प्राध्यापक तथा कर्मचारी यांनी अनवर अन्सारी व कु साक्षी कारेवाले तथा कु कविता आत्राम यांचे कौतूक तथा अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post