शतकीय वर्षाच्या आजीबाईंनी घेतला अखेरचा श्वास....यशोदाबाई चाटे यांचे निधन, 12 वाजता वणीतील मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार....

वणी :- 

   रंगनाथ नगर येथिल रहिवासी बापुराव यल्लन्ना चाटे यांची धर्मपत्नी तथा रमेश बापुराव चाटे यांची आई यशोदाबाई बापुराव चाटे, वय अंदाजे 100 वर्ष यांचं वृद्धापकाळाने दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे. 
     त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार दिनांक 31 ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुली, जावई, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post