संजय देरकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

 
वणी : 
वणी विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दि.२९ ऑक्टोंबर ला जोरदार शक्तीप्रदर्शन करत दाखल केला आहे.
 यावेळी वणी, मारेगाव, झरी-जामणी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी खासदार संजय देशमुख (यवतमाळ वाशीम), काँग्रेस चे नेते वामनराव कासावार, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय नगराळे, संजय निखाडे, सुनील कातकडे, दीपक कोकास, काँग्रेस च्या अरुणाताई खंडाळकर, महिला जिल्हा संघटिका डीमनताई टोंगे, साधनाताई गौरकार, टिकाराम कोंगरे, घनश्याम पावडे, मारोती गौरकार,आशिष खुलसंगे, राजेश कासावार, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंगळवारी सकाळी संजय देरकर यांच्या उमेदवारीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हजारो कार्यकतें स्थानिक जत्रा मैदान येथे उपस्थित झाले होते. दरम्यान संजय देरकर यांनी रंगनाथ स्वामी मंदिर, भगत सिंग चौक, गांधी चौक, खाती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गक्रमण करीत नागरिकांना अभिवादन करत शासकीय मैदान पाण्याची टाकी येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
यानंतर  संजय देरकर यांनी निवडणूक अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.वणी विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी महाविकास आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दि.२९ ऑक्टोंबर ला जोरदार शक्तीप्रदर्शन करत दाखल केला आहे.
 यावेळी वणी, मारेगाव, झरी-जामणी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post