वणी :
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, तसेच आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी स्वतंत्र कॉलम आणि डिजिटल अर्जामध्ये स्वतंत्र ड्रॉप-डाऊन मेन्यू उपलब्ध करून देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-मारेगाव-झरीजामणी यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी वणी येथे शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर, शिवतिर्थ, वणी येथे हा सत्याग्रह होणार आहे. ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळावे, यासाठी तालुक्यातील नागरिक, युवक-युवती, महिला-पुरुष, शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अचूक जातनिहाय आकडेवारीची मागणी
सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात जनगणनेमध्ये जात नोंदणी खुल्या स्वरूपात झाल्याने विविध प्रकारच्या नोंदी, स्पेलिंगमधील चुका तसेच पोटजातींच्या नोंदी यामुळे मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झाल्याचा मुद्दा समितीने उपस्थित केला आहे. भविष्यातील जनगणनेत अशा त्रुटी टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत OBC यादीनुसार स्वतंत्र डिजिटल ड्रॉप-डाऊन मेन्यूच्या माध्यमातून जात नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“जातनिहाय जनगणना — ओबीसींच्या अचूक संख्येसाठी आणि योग्य प्रतिनिधित्वासाठी आवश्यक” या भूमिकेतून हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी प्रदीप बोनगिरवार, मोहन हरडे, राजू पिंपळकर, गजानन चंदावर, जगदीश ढोके, मंगेश रासेकर, आशिष काळे, दिवाकर नरुले, रमेश येरणे, प्रवीण निकोडे, पांडुरंग पंडिले, काशिनाथ पचकटे, किशोर ओचावार, राजाभाऊ बोलोरिया, सुरेश बन्सोड, अजय चन्ने, अनिल आक्केवार, मोरेश्वर उज्वलकर, असिफ शेख, सिद्दीक रंगरेज, रईस कुरेशी, गणेश धानोरकर, महेश मुळेवार, विकास चांदवडकर, विजय माळीकर, गणेश लाड, राजेंद्र जयस्वाल, सुरेश मांडवकर, राहुल चौधरी, नितीन धाबेकर, डुडू नक्षिणे, संजय चिंचोलकर, पुरुषोत्तम नवघरे, प्रा. विनोद चव्हाण, आकाश अक्कलवार, दादाराव राऊत, कैलास पचारे, प्रमोद लोणारे, रवी सोनकुसरे, प्रदीप बोरकुटे, सुभाष वैद्य, पांडुरंग ताटेवार, संजय वाणी, सागर मुने, रवींद्र आंबटकर, शैलेश अडपावार, नारायण मांडवकर, अशोक चौधरी, नितीन मांदाडे, ॲड. अमोल कळस्कर, विनोद किडीले, नंदुभाऊ गुरुकर, संतोष जयस्वाल, राजेश पहापळे, बंडू नींदेकर, किसन दूधलकर, अशोक अंकतवार यांच्यासह इतरांनी आवाहन केले आहे.