नायगाव (खुर्द) येथे शिवसेना शाखेचे उत्साहात उद्घाटन, जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते शाखेचे लोकार्पण;

वणी :

तालुक्यातील नायगाव (खुर्द) येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संघटक मा. विजय बाबू चोरडिया यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अरविंद तुराणकर यांची शाखाप्रमुख, श्रीकांत मंगाम यांची उपशाखाप्रमुख, युवराज तुराणकर यांची शाखा संघटक, प्रफुल ठाकरे यांची शाखा समन्वयक आणि सुनील सुसंकर यांची शाखा सचिवपदी निवड करण्यात आली.
उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विजय बाबू चोरडिया यांनी शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहून समाजहिताची कार्ये करण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याने पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला दीपक कोकास, सुधाकर गोरे, आशिष खुळसंगे, उमेश वैरागडे, किशोर नांदेकर, प्रसाद ठाकरे, शिवराज पेचे, शुभम गोरे, धीर राजूरकर, राहुल पारखी, हिमांशु बोहरा, अनिल ढगे, अमृत पुरी, कपिल कुंटलवार आणि प्रज्योत ठावरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्घाटनानंतर उपस्थित सर्वांनी नव्या शाखेच्या माध्यमातून जनसेवा, समाजहित आणि शिवसेना संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post