मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत २२ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर

वणी :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर वरोरा रोडवरील बाजोरिया हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडणार आहे.
समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये आणि रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळावे, या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडळाने २०० रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
या रक्तदान शिबिरात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच वणी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याने आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक व इच्छुक नागरिकांनाही या सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
शिबिराचे ठिकाण : बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.००
आयोजक : भारतीय जनता पार्टी, वणी शहर
संपर्क :
संयोजक : श्री. बालाजी भेदोडकर (युवा मोर्चा अध्यक्ष) – ९७३८३४१६१६
सहसंयोजक : श्री. विलास डवरे (शहर उपाध्यक्ष) – ९४०४५२६७६९
सहसंयोजक : श्रीमती वैशाली वातिले (नगरसेवक) – ९४२१८५१७२५
सहसंयोजक : सौ. भारती बदखल (शहर उपाध्यक्ष) – ८३२९११६७०५
या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी, वणी शहरचे शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post