वणी :
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कापूस क्रांती उत्पादकता अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत वणी तालुक्यातील मौजे मानकी येथे उन्नती शेतकरी समूहातील महिला तसेच एकल विधवा महिलांना २९ जून रोजी कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
महिला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, कापूस उत्पादनात गुणवत्तापूर्ण वाढ घडवून आणणे आणि आधुनिक शेतीला चालना देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमातून पात्र महिला लाभार्थींना शासनाच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.
या प्रसंगी श्रीमती पुष्पा काकडे, सीमा काकडे, सविता मिलमिले, दुर्गा पुरी, लिला काकडे, छाया वासेकर, मंगला वैद्य, सुनिता वासेकर, रेखा वाटगुरे आणि कल्पना ठेंगणे या महिला लाभार्थींना कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले.