क्षेत्र रामदेगी येथे अखंड नामस्मरणाचा महासोहळा; १५ जूनला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद

स्टिंग ऑपरेशन न्यूज | रामदेगी :

चंद्रपूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र रामदेगी येथील विठ्ठल मंदिर देवस्थानात धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात श्री अखंड नाम जप यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाची कलश स्थापना १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प. श्री गोविंद महाराज रामदेगी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, दुपारी १२ वाजता होमहवन तसेच दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यज्ञ सोहळ्यांतर्गत १४ जून रोजी श्री महिला भजन मंडळ, राळेगाव यांच्याकडून जागृती भजन सादर करण्यात येणार आहे. तसेच १५ जून रोजी सकाळी ११ वाजता ह.भ.प. श्री गजानन महाराज गुजरकर (येरणगाव) यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ह.भ.प. गोविंद महाराज सातघरे, नितीन महाजन झाडे , रामदेगी ग्रश यांनी केले आहे. श्री विठ्ठलाच्या नामघोषाने आणि अखंड जपाने रामदेगी परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post