सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धा उत्साहात , गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम; जि.प. शाळा मानकी द्वितीय

वणी :

 शिक्षण विभाग, पंचायत समिती वणी अंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर २०२६ रोजी एस.पी.एम. विद्यालय, वणी येथे करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी श्री. स्नेहदीप काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रसमन्वयक कुमुदिनी देवतळे मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी.एम. विद्यालयाचे प्राचार्य श्री. क्षीरसागर सर व प्राध्यापक श्री. शोभणे सर उपस्थित होते. परीक्षक म्हणून सौ. सीमा सोनटक्के मॅडम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन विषयशिक्षक सौ. सपना वासेकर यांनी केले, तर प्रास्ताविक विषयसाधन व्यक्ती कु. अल्का काळे यांनी केले.
गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल, वणी प्रथम क्रमांक 
जि.प.उच्च प्राथमिक शाळा, मानकी द्वितीय क्रमांक 

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. गणेश भोयर तसेच केंद्रसमन्वयक श्री. नितीन मोवाडे यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण सौ. सीमा सोनटक्के यांनी केले.
स्पर्धेत गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल, वणी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मानकी यांनी द्वितीय, तर लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, वणी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील उत्कृष्ट कलावंत म्हणून सौ. सीमा सोनटक्के मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विषयसाधन व्यक्ती कु. निशा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बीआरसी कर्मचारी कु. धनलक्ष्मी लक्षट्टीवार तसेच एस.पी.एम. विद्यालय, वणी यांच्या वतीने मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post