वणी :
वणी येथील रहिवासी स्व. सुशीलाबाई सुरेशराव लांजेवार यांचे दि. २२ मे शुक्रवार रोजी सायंकाळी ७:३० वाजता दुःखद निधन झाले. त्या शिवसेना वणी शहरप्रमुख स्व. ललित लांजेवार यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, नातवंडे असा आप्त परिवार आहे.
दि. २३ मे शनिवार रोजी सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून मोक्षधामकडे निघणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.