सामाजिक बांधिलकी जपत संजय खाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,

वणी :

शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले.
शनिवारी सकाळी श्री रंगनाथ स्वामी मंदिर येथे देवस्थान समितीच्या वतीने संजय भाऊ खाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर सकाळी १०.३० वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
दुपारच्या सत्रात बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. वृद्धांप्रती कृतज्ञता आणि सामाजिक जाणीव जपत हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post