वणी :
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती तसेच शेतकरी बांधवांसमोरील संकट लक्षात घेऊन अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली.
वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ₹२१ हजारांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस मदत म्हणून जमा करण्यात आली. संकटाच्या काळात गरजू नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलण्याच्या भावनेतून हा उपक्रम करण्यात आला.
“वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस व्हावा, या भावनेतून ही मदत केली आहे. महाराष्ट्रातील संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी व्यक्त केली.