वेकोली प्रकल्पबाधितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बच्चू कडूंचा पाहणी दौरा, बोरगाव (अहेरी) येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद; भूसंपादन, मोबदला, रोजगार व पुनर्वसनाच्या प्रश्नांवर होणार चर्चा

वणी :

वेकोली प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी विधानसभा आमदार तथा शिवसेना (विदर्भ) नेते बच्चूभाऊ कडू यांचा ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बोरगाव (अहेरी) येथे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात वेकोली प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या जाणार आहेत. यामध्ये भूसंपादन, योग्य मोबदला, स्थानिकांना रोजगार, प्रदूषणावर उपाययोजना तसेच पुनर्वसन आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीला परिसरातील प्रकल्पबाधित शेतकरी, कामगार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.
दरम्यान, या दौऱ्याचे आयोजन वणी विधानसभा अध्यक्ष सतीश देरकर तसेच प्रहार शेतकरी संघटना वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष रघुवीर कारेकर यांनी केले आहे. प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी या पाहणी दौऱ्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post