वणीत ईदपूर्व शांतता समितीची बैठक उत्साहात संपन्न

वणी :-

येथील पोलीस स्टेशनच्या आवारात शनिवार दि. 23 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. 28 मे रोजी होणाऱ्या ईद सणोत्सवानिमित्त शहरात शांतता, सामाजिक ऐक्य व सुव्यवस्था कायम राखण्याच्या उद्देशाने ही बैठक पार पडली.
बैठकीस ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे, पोलीस उपनिरीक्षक महापुरे, उपनिरीक्षक वडतकर, पोलीस उपनिरीक्षक महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्व समाजबांधवांनी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन केले. तसेच समाजामध्ये वाढत चाललेल्या कौटुंबिक वादांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
शांतता समितीचे सदस्य प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना वणी शहर हे शांतताप्रिय शहर असून येथे सर्व जाती-धर्मातील नागरिक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होत असल्याचे सांगितले. सर्वांनी एकोप्याने ईद सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नईम अजीज यांनी ईद सणादरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने विशेष सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मंगल तेलंग यांनी मुख्य बाजारपेठेतील दुकानांसमोर लावण्यात येणाऱ्या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
याप्रसंगी शांतता समितीच्या सदस्यांमध्ये सौ. मंगलाताई झिलपे, नईम अजीज, मंगल तेलंग, प्रा. पुरुषोत्तम पाटील, नरेंद्र लोणारे, वैजनाथ खडसे, मंगेश रासेकर, मौलाना, पत्रकार विनोद ताजने, रमेश तांबे, सुरेंद्र इखारे, परशुराम पोटे, आकाश दुबे, प्रशांत जुमनाके आदींसह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.
सभेचे आभार पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी, सतीश मुजमुळे, संदीप सोयाम, पोहवा सतीश तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post