छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वणीत अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न

वणी /

आज दिनांक १४ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, विराणी टॉकीज रोड, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या शौर्य, स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा जागर उपस्थितांमध्ये करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या प्रसंगी अजय धोबे (नगरसेवक, नगर परिषद वणी तथा जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, यवतमाळ), नगरसेवक नितीन धाबेकर, अशोक चौधरी, दत्ता डोहे, आशिष रिंगोले, संदीप गोहोकर तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post