वणीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जयंती उत्साहात साजरी

वणी :

“गीतांजली”कार आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती वणीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील टागोर चौक येथे असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
विशेष म्हणजे, विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा पूर्णाकृती पुतळा अभावानेच पाहायला मिळतो. सुमारे शंभर वर्षांपूर्वी श्री गणेश विद्यार्थी मंडळाने हा पुतळा उभारला होता. या पुतळ्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे.

वणीलादेखील त्यांची जयंती नुकतीच साजरी झाली. या कार्यक्रमावेळी परशुराम पोटे, सुनील इंदुवामन ठाकरे, आसिफ शेख, राजू धावंजेवार, ज्ञानेश्वर बोनगिरवार, आकाश डुबे, पांडुरंग लांजेवार आदी उपस्थित होते. गुरुदेव टागोर यांच्या साहित्य, कला आणि सामाजिक विचारांच्या योगदानाला यावेळी उपस्थितांनी अभिवादन केले.

Post a Comment

Previous Post Next Post