वणी /
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, वणी येथील एस.पी.एम. विद्यालयाने 90.71 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. विद्यालयातील २३७ विद्यार्थ्यांपैकी २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या निकालात कु. आरोही प्रमोद ढेंगळे हिने ९८.२० टक्के गुण मिळवून विद्यालयातून तसेच वणी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. ओजर सुरेंद्र दैवलकर याने ९४.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळविला. तर कु. अनुष्का अरविंद झाडे हिने ९३.६० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयभाऊ मुकेवार, उपाध्यक्ष श्री. नरेंद्रजी बरडिया, सचिव श्री. सु. धो. देशमुख, सहसचिव श्री. अशोकजी सोनटक्के तसेच मंडळाचे सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद क्षीरसागर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.