पालकमंत्र्यांच्या हस्ते राम झिले यांचा गौरवपूर्ण सत्कार ,

वणी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व अलौकिक कार्य केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील लोककलावंत राम झिले यांना ‘राष्ट्रपिता व्यसनमुक्ती पुरस्कार 2021-22’ जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
राम झिले हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांनी समाजातील व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यशाळा, प्रबोधनपर कार्यक्रम तसेच सार्वजनिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने सातत्याने उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे दिनांक 26 मार्च 2026 रोजी ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या गौरवपूर्ण यशाबद्दल यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांच्या हस्ते राम झिले यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात सन 2021 ते 2025 या कालावधीत व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुरस्कर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर समाजकल्याण अधिकारी मंगला मुन, ओमप्रकाश नगराळे तसेच महिला व बालकल्याण अधिकारी विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post