वणी :
सुषगंगा पॉलिटेक्निक, वणी येथे IEDSSA H-झोन पुरुष कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. या दोन दिवसीय स्पर्धेत विभागातील १८ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, संघभावना आणि क्रीडास्पृहाचे दर्शन घडविले. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या उपांत्य व अंतिम सामन्यात सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर साई पॉलिटेक्निक, किन्ही (जावडे) संघाने उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सुषगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री. प्रदीप बोंगीरवार सर तसेच सुषगंगा पॉलिटेक्निक, वणीचे संचालक श्री. मोहन बोंगीरवार सर यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुषगंगा पॉलिटेक्निक, वणीच्या प्राचार्या सौ. पुष्पाराणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच IEDSSA कबड्डी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य श्री. चैतन्य तुरविले सर व श्री. कुणाल गावंडे सर यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधून स्पर्धा यशस्वी केली.
कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्व सहभागी संघ, आयोजक व स्वयंसेवकांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.