वणी :
नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेत वणी येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या चमुंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय पारितोषिक पटकावले आहे.
हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर आणि श्री गुरुदेव क्रीडा मंडळ गोवरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामगीता चषक’ भव्य पुरुष व महिला मिनी विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मराठा लान्सर नागपूर यांनी पटकावले, तर द्वितीय पारितोषिक जय सेवालाल देवठाणा वाशिम यांच्या संघाला मिळाले. तृतीय पारितोषिक वणी येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या संघाने मिळवत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.