विश्वकर्मा जयंतीनिमित्त महेश राखुंडे मित्र परिवारातर्फे चहा, पाणी, केळी व बिस्कीट वाटप

वणी /

विश्वकर्मा जयंती निमित्त शहरात काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीतील भाविकांना महेश राखुंडे मित्र परिवाराच्या वतीने चहा, पाणी, केळी व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शुभम जयपूरकर, राहुल वांढरे, गणेश कायरकर, अक्षय झीलपे, निलेश लांडे, किशोर बुरडकर, तोशील झीलपे, अजिंक्य गहूकर, चंदू वनकर, प्रशांत अंड्ररस्कर, सुनिल अंड्ररस्कर तसेच सुहास झीलपे यांचे सहकार्य लाभले.
शहरातील नटराज चौक येथील महादेव मंदिरात विश्वकर्मा जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महादेव मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नटराज चौक, विश्वकर्मा चौक, गांधी चौक, अणे चौक, डॉ. आंबेडकर चौक, टोगोर चौक, सर्योदय चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक मार्गे पुन्हा नटराज चौक येथे येऊन महादेव मंदिरात पालखी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post