वणी प्रतिनिधी / विजय महाकुलकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सावरकर चौक, जत्रा रोड, वणी येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच, वणी यांच्या वतीने श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या देशभक्तीपर कार्याचा व क्रांतिकारी विचारांचा आढावा घेत त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली.
या कार्यक्रमास दिनकरराव पावडे, नितीन वासेकर, तुकाराम माथनकर, सुरेश मोरे, संजय दोरखंडे, अनुप पावडे, एकनाथ मांडवकर, विशुभाऊ झाडे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, अंबर घरोटे, किशोर शिरसागर, संतोष कर्णेवार, डहालकर काका आदी उपस्थित होते.