'
वणी येथील शिवसैनिकांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान राबवत श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त दोन महापुरुषांना मानवंदना अर्पण केली.
स्वराज्याच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगेबाबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारण्यात आला. गड परिसरातील कचरा संकलन करून स्वच्छतेचा आदर्श घालून देण्यात आला.
शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, स्वराज्य आणि शिस्तीचा आदर्श तर संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश — या दोन्ही महान विचारांचा संगम रायगडाच्या पायथ्याशी अनुभवायला मिळाला.
या स्वच्छता अभियानात अजिंक्य शेंडे, राजू तुरणकर, बंडू चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुटकर आदी वणीतील शिवसैनिक सहभागी झाले होते.
“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” हा संदेश देत केवळ जयंती साजरी न करता कृतीतून दोन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.