वणी /
मकर संक्रांत निमित्त वैद्य.सुवर्णा चरपे यांचा रामदेव बाबा अपंग मुकबधीर विद्यालय, चिखलगाव, वणी येथे "आरोग्याचे वाण" कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार ,दि.१७ जानेवारी रोजी, दुपारी २.०० ते ५:३० या वेळेत ,श्री विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर वणी च्या संस्थापिका व नाडी परिक्षण तज्ञ वै.चरपे यांच्या मार्फत अपंग मुकबधीर विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. याकरीता विद्यार्थी वर्गाशी संवाद साधताना शिक्षिका सौ.आवळे ,सौ.हिवरे बाईंनी मदत केली. चाळीस विद्यार्थ्याचे आयुर्वेदोक्त नाडी परिक्षण व आजारांचे निदान करण्यात आले. एकुण छत्तीस विद्यार्थ्यांना आठवडाभराची आयुर्वेदिक औषधी मोफत वाटण्यात आली. काही विद्यार्थ्यांना वेगळ्या उपचारांची गरज भासली.त्यांच्या पालकांशी फोनवर संपर्क साधला. व गांभीर्या समजून सांगण्यात आले.समाजातील प्रत्येक मुल देशाचे उज्वल भविष्य आहे. निकोप समाज व्यवस्थेकरीता अपंग मुकबधिर मुले अधिक जपवणुक व प्रेमाचे ,अधिकारी आहेत,असे मत चरपे मॅडम यांनी व्यक्त केले. त्या दरवर्षी समाजोपयोगी वेगवेगळ्या कल्पनेवर आधारित हळदीकुंकू समारंभ आयोजित करत असतात. त्यापैकी हा वेगळा उपक्रम आहे.
या कार्यक्रमासाठी सिनेट सदस्य गजानन कासावार, सरोज भंडारी, श्री.भंडारी, यांनी चंद्रलेखा नारोकार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच चिकित्सालयाचे सहकारी सुनंदा शिलमनवार, निखिल वाघाडे,धृव चरपे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.