वणी :-
सुशगंगा पॉलिटेक्निक, वणी येथे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी आयोजित मेगा प्लेसमेंट ड्राइव्ह 2026 यशस्वीरीत्या पार पडला. या ड्राइव्हमध्ये विविध शाखांतील एकूण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांनंतर 31 विद्यार्थ्यांची निवड BAJAJ AUTO LTD व DHOOT TRANSMISSION या नामांकित कंपन्यांमध्ये करण्यात आली.
हा उपक्रम स्वालंबी शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोंगीरवार व संचालक मोहन बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य प्रा. पुष्पा राणी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा ड्राइव्ह यशस्वी ठरला.
या उपक्रमाचे समन्वयन चैतन्य तुरविले सर, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी यांनी केले. आमधनई प्रा. लि. (AamdhanE Pvt. Ltd.) यांच्या वतीने वरिष्ठ HR भरती व्यवस्थापक अमन शर्मा व टीम लीडर राहुल भीसे यांनी विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया पार पाडली.
या यशस्वी आयोजनासाठी मैथिली बोधे मॅडम, कुणाल गावंडे सर, दिनेश कुमार सर तसेच सुशगंगा पॉलिटेक्निक, वणी येथील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.