आता वणीकरांच्या प्रलंबित समस्या सुटणार ! जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच जनता दरबाराचे आयोजन, जनतेनी विविध समस्या असल्यास संपर्क साधावा - शिवसेना नेते विजय चोरडिया

वणी /

गेली चार वर्षांपासून नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे त्यामुळे जनतेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. 
प्रशासन म्हनजेच विविध पदावरचे व विविध विभागांचे अधिकारी म्हत्वाची कामे करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शहरातील चित्र आहे. केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे नागरीकांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. त्यातच अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची प्रचिती अनेक नागरिकांना अनुभवली आहे. परिणामी शहरात विविध समस्मायांचा डोंगर निर्माण झाला आहे. मात्र आता नागरीकांना साऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या जनता दरबाराचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतूसाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून लवकरच ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना पक्ष नेते विजय चोरडिया यांनी दिली. 

तसेच वणीकर नागरिकांनी आपल्या विविध समस्या असल्यास शिवसेना जनसंपर्क कार्यालय वणी विधानसभा, घर संसार सेल जवळ जैन मंदिर समोर, संपर्क राजु रिंगोले -92848 81655, विक्की -99221 65885 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही शिवसेना पक्षनेते विजय चोरडिया यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post