उमरी गावचे सरपंच श्री तुकाराम माथनकर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.

वणी /

वणी तालुक्यातील उमरी गावचे सरपंच व सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री तुकाराम माथनकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण समारंभ काट भवन नदी पेठ पुणे येथे पार पडला. 
नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेकडून सर्वेक्षणादरम्यान महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२५ साठी उल्लेखनीय कामगिरी बद्दल संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री तुकाराम भाऊ माथनकर यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post