सैनिकांप्रती कृतज्ञतेने उजळली दिवाळी दिव्या-दिव्यात तेजाळला देशभक्तीचा प्रकाश, घाटलाडकी येथे 'एक दिवा शहिदांसाठी" कार्यक्रम साजरा

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

 दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. पण देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या सैनिकांची दिवाळी म्हणजे त्यागाची खरी ज्योत आणि त्यातून निर्माण होणारा देशभक्तीचा प्रकाश आणि जबाबदारीचं तेज. अशा या माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व वीर माता, वीर पिता आणि वीर पत्नी यांच्या सोबतची दिवाळी म्हणजे सैनिकांप्रती एक प्रकारे कृतज्ञ होण. हीच कृतज्ञता "एक दिवा सैनिकांसाठी" या कार्यक्रमात अनुभवायला मिळाली.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी या गावात दिवाळीच्या दिवशी "एक दिवा शहिदांसाठी" लावून कार्यक्रम घेण्यात आला.

गावचे प्रतिष्ठीत नागरिक श्री मनोहर सिंह पवार यांच्या संकल्पनेतून आणि श्री मनोज बारस्कर, कपले सर, राहुल राजस, किरण गडलिंग (माजी सैनिक) केशवराव गावंडे, रोशन जयसिंगपुरे, प्रमोद नाटस्कर यांच्या सहकार्यातून ही आगळी वेगळी भावनिक दिवाळी सुरू झाली. आणि ८ वर्षांपासून "एक दिया शहिदों के नाम" समितीच्या आणि गावकऱ्यांच्या वतीने एक दिवा शहिदांसाठी लावून हा कार्यक्रम साजरा केला जातो.

या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त सुट्टीवर आलेले जवान तसेच देशासाठी सेवा पूर्व केलेल्या माजी सैनिकांचा सहपरिवारासह सत्कार करण्यात आला. 
यंदाच्या दिवाळीचा हा प्रकाश फक्त घराघरात नाही, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक सैनिकाच्या त्यागाला उजाळा देणारा ठरला आहे. समाज जेव्हा आपल्या वीरांना स्मरतो, तेव्हाच ती खरी दिवाळी होते. एकूणच या कार्यक्रमातून समाजात सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून समाजात ऐक्य आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post